जयवंतराव भोसले पॉलिटेक्निक व यशवंत ज्युनिअर कॉलेज कोकरुड श्री संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप चे ठरले मानकरी.

घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगांव, ता. कराड येथील श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे, श्री. संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने श्री.संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. या कबड्डी स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 20 संघ सहभागी झाले होते. त्यामधील 12 संघ हे ज्युनिअर कॉलेजचे होते. आणि 8 संघ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे सहभागी झाले होते.

मुलां मध्ये प्रथम विजेता संघ जयवंतराव भोसले पॉलिटेक्निक किल्ले मच्छिंद्रगड या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले या संघाने 7777-/ हजार रुपये रोख रक्कम व चषक पटकावले.   

   तर द्वितीय पारितोषिक SGM कॉलेज कराड या महाविद्यालयीन संघाने 4444/- हजार रुपये रोख रक्कम आणि चषक पटकावले . मुलीं मध्ये प्रथम पारितोषिक यशवंत ज्युनिअर कॉलेज कोकरुड या संघाने 4444/- हजार रुपये रोख रक्कम व चषक पटकावले.

तर द्वितीय पारितोषिक 3333/- हजार रुपये रोख रक्कम व चषक SGM कॉलेज कराड या संघाने पटकावले. मुलां मध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभंम पंढरीनाथ दुर्गावळे व मुलीं मध्ये कु. आर्या संजय पाटील या दोघांनी उत्कृष्ट खेळाडू चा बहुमान मिळवला या दोघांनाही ओम फुटवेअर उंडाळे यांच्याकडून शूज गिफ्ट देण्यात आले. 

सर्व विजेत्या व उपविजेत्या संघाचा प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला.

श्री संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.सर्व सामन्यांसाठी पंच म्हणून अजिंक्य थोरात व शुभम पवार यांनी उत्तमरीत्या काम पाहिले.



स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले अनेक दिवस क्रीडा विभाग प्रमुख दीपक पवार व त्यांच्या कमिटीतील सर्व सदस्य तसेच श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

विजेत्या व उपविजेत्या संघाचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी सर, संचालक डॉ. अशोक जोहरी, प्राजक्ता जोहरी यांनी अभिनंदन केले.