पोलीस पाटील यांचे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण.

प्रलंबित मागण्या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी ; साखळी उपोषणास माण तालुका पोलीस पाटील पाठिंबा. 



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
     पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीस इतर प्रलंबित मागण्या वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेंडेवाडी ता. पाटण येथील पोलीस पाटील संतोष शामराव पवार यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पोलीस पाटील यांना साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शवला आहे. 

 पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मानधन वाढीस इतर सर्व मागण्या संदर्भात देऊनही सध्याचे सरकार याचा गांभीर्थनि विचार करत नाही. तसेच मध्या अगणारे तुटपुंजे ६५00 बार निवेदन आम्हा नियुक्त झालेपासुन आजपर्यंत कधीच वेळेन महिन्याचे पहिन्याला मिळाले नाही. या तुटपूज्या मानधनात कुटुबांचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही. यासाठी शासनाला जाग यावी व शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या व आत्ता येणाया अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमचे मानधन वाढवावे म्हणून मी श्री. संतोष शामराव पवार दिनांक २१.०२.२०१४ रोजी पासुन आझाद मैदान येथे लोकशाही व कायदेशीर मागनि आमरण उपोषण करणार आहे. व त्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटील साखळी उपोषण करणार आहे.

आमच्या पलंबित मागण्या पुढीलप्रमाणे :

१. प्रमुख मागणी मानधन वाढ दरमहा २१०००/- इतके मिळवे व दरमहा वेळेत मिळावे .

२. नुतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.

३. पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याची तरतुद करावी.

४. सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यात यावे.

वरील सर्व मागण्या मंजुर होणेसाठी हे आमरण उपोषण करत असल्याने शासनाने याने गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य करून पोलीस पाटलांना न्याय देण्यात यावा ही विनंती.