कुंभारगांव विकास सेवा सोसायटी मार्फत आनंदाचा शिधा वाटप वितरण.

 

कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 कुंभारगांव ता पाटण येथील विविध कार्यकारी सोसायटीत श्री राम प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्त्याच्या पात्र शिधापत्रिका धारक360पैकी 342 उपलब्ध लाभार्त्याना आनंदाचा शिधा वितरण करण्यात आले.  

यावेळी उपस्थित लाभार्त्याना साखर एक किलो, खाद्य तेल एक किलो, चणाडाळ अर्धा किलो, रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, पोहे अर्धा किलो अश्या सहा वस्तू असले किटचे 100/-रुपयात वितरण करण्यात आले. 

या शुभारंभ प्रसंगी बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण,कुंभारगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, विध्यमान सदस्य किशोर चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार,संचालक राजेंद्र पुजारी,जगन्नाथ देसाई, रमेश यादव, आनंदा माटेकर,जगुताई सुर्वे, सोसायटीचे सेल्समन विलास मोरे, ईश्वर मोरे, लाभार्थी जीवन स्वामी,सिताराम पवार, संजय सुतार आदी उपस्थित होते.