संजय देसाई यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगांव, ता.पाटण या गावाचे सुपुत्र, नवभारत पतसंस्थेचे संस्थापक संजय दादासोा देसाई यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. 
कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी कुंभारगावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा शिक्षण व अर्थ समिती सभापती असा प्रवास केला आहे. याशिवाय विविध राजकीय पदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे पेलली आहे.

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.