विधुत प्रवाहाच्या धक्याने मंद्रुळकोळे येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मंद्रुळकोळे ता पाटण येथील युवक ओंकार प्रमोद पाटील वय १७ शुक्रवारी गावात चालू असलेल्या घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विधुत प्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने खाली कोसळला यावेळी त्यास ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र डॉकटरानीं त्यास मृत घोषित केले.                           

याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की ओंकार पाटील सायंकाळी पाचच्या दरम्यान घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विधुत प्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने चक्कर येऊन पडल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते यावेळी डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केले त्याचे पश्चात आई, वडील, भाऊ, आजी चुलते असा परिवार आहे.

 या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये झाली असून स.पो,नि शैलजा पाटील यांचे मार्गदर्शना खाली या घटनेचा अधिक तपास हवालदार अजय माने करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.