सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महिला संयोजकपदी कविता कचरे


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महिला संयोजक म्हणून भाजपच्या राज्य अध्यक्ष चित्रा वाघ यांनी सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या कविता कचरे यांची सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मंगल वाघ, स्वाती शिंदे, प्रदेश सचिव महिला मोर्चा ज्योती कांबळे, सातारा समन्वयक रंजना राऊत, प्रदेश कार्यकारीनी सदस्या भाजपा सुनीषा शहा, प्रदेश सचिव महिला मोर्चा रीना भणगे, सातारा शहर अध्यक्ष वैष्णवी कदम, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस दैवशीला मोहिते, सरचिटणीस गीता लोखंडे, अश्विनी हुबळीकर, नेहा खंदारे, वैशाली टाकसाळे आदी उपस्थित होत्या.