कर्तव्य पथ पर ही चलूं…

 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्याकडून लग्नसोहळा व पूजाविधी आटोपून कारखान्याच्या कामकाजास सुरुवात

पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांचा शुभविवाह 28 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर पूजाआदी कार्याक्रम आटोपून आजपासून त्यांनी कारखाना कार्यालयात उपस्थित राहून कामाकाजास सुरुवात केली. यावेळी कारखान्याच्या पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने मा. यशदादांचे अत्यंत आनंदात स्वागत करून विवाहप्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा दिल्या.  

खरं तर सोशल मीडियाच्या आजच्या जगात विवाह समारंभाचे अनेक ट्रेण्ड्स पाहायला मिळत असतात. विवाह सोहळ्यापूर्वी आणि तो झाल्यानंतरही बरेच दिवस काही ना काही इव्हेंट घडवून विवाहाच्या मंगलकार्याचा अनावश्यक जल्लोष केला जातानाही आपण पाहात असतो. मात्र, या साऱ्याला दूर सारून मा. यशराज दादांसारख्या युवा नेतृत्वाकडून कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतून जनसेवेला प्राधान्य दिले जाते, तेव्हा आश्वासक वाटते. ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’सारख्या इंग्रजी पुस्तकातून डिजिटल जगातील आभासी जगण्यापेक्षा आपल्या व इतरांच्या वास्तव जगण्यातही सकारात्मकता कशी आणावी, याबद्दल मा. यशराज दादांनी त्यांचे विचार मांडले आहेत. लग्नसोहळा व पूजाविधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवसापासून कामकाजास सुरुवात करून त्यांनी आपल्या विचार आणि आचारात अजिबात अंतर नसल्याचे दाखवून दिले आहे. विवाह आणि त्यानंतरचे विधी, परंपरेने चालत आलेली प्रथाकार्ये पार पाडत असतानाच कर्तव्यमार्गापासून मात्र ढळायचे नाही, याचे उदाहरण मा. यशराजदादांनी आपल्या कृतीतून घालून दिले आहे.   

कामाप्रति निष्ठा, जनसामान्यांप्रति संवेदनशीलता आणि अभ्यासू नेतृत्व ही मा. यशराजदादांची ओळख यामुळे अधिक ठळक झाली आहे. लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा उत्तुंग वारसा लाभलेले आणि मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची धुरा अभ्यासू व खंबीरपणे सांभाळत असलेले मा. यशराजदादा हे त्यामुळेच आजच्या युवा नेतृत्वाच्या फळीतील आदर्श ठरतात!