घोगाव येथे फार्मसी महाविद्यालयाच्या श्रम संस्कार शिबिराचा शुभारंभ.
घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांकडून घोगाव गावा मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित केले आहे.
सदरचे श्रमसंस्कार शिबिर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव.ता. कराड जि. सातारा. यांच्या संयुक्त विद्यमाने घोगाव मध्ये आयोजित करण्यात आले.या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन घोगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सीमा धनाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रवीणकुमार लादे होते .

घोगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निवासराव शेवाळे , तंटामुक्ती अध्यक्ष नेताजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य रेखा साळूंके , मानाजी माने, सुनंदा भावके,शिवाजी पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष अरूण साळूंखे आदी मान्यवराची विशेष उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर व उपस्थितांचे विजय पवार यांनी आभार मानले.