पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले छोटया ‘स्पंदन’चे कौतुक.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई आणि वैष्णवीराजे निंबाळकर यांचा शाही विवाहसोहळा अत्यंत दिमाखदार आणि नेत्रदीपक पध्दतीने पार पाडला. या सोहळयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्रीमहोदय यांच्यासह पाटण मतदारसंघातील जनता मोठया संख्येने उपस्थित होती. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या लग्नसोहळयात कुटूंबप्रमुखाची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडल्याचे दिसून आले. लग्नाला आलेले पाहुणे, नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्या स्वागताची, जेवणाची, सोय व्यवस्थित आहे का याची ते आपुलकीने विचारपूस करत होते.

 मतदारसंघातील लग्नाला निमंत्रित केलेली जनता, कार्यकर्ते यांच्या पंगतीत फिरुन ना.शंभूराज देसाई हे जेवणाची व्यवस्था विचारत होते. यावेळी ‘‘साहेब, यशराजदादांच्या पत्रिका स्पंदन डाकवेने त्याच्या डाकेवाडी मध्ये वाटल्या आहेत.’’ असे सांगताच त्यांनी स्पंदन डाकवेला जवळ बोलावून घेतले. त्याच्या डोक्यावर आणि गालावर हात फिरवत ‘‘अरे वा...! छानच..! ये फोटो काढ..!’’ असे म्हणत छोटया स्पंदनचे कौतुक केले. लगीनघाईच्या या गोंधळात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकून घेतली. ना.देसाई यांच्यासमवेत यावेळी अॅड.उदयसिंह पाटील, नातेवाईक, मित्रपरिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.