श्री संतकृपा शिक्षण संस्थेत श्री संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन संघाचा समावेश.



घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने श्री संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली आहे. गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी 2024 रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:०० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेचा शुभारंभ श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

ही कबड्डी स्पर्धा डिप्लोमा महाविद्यालयाचे विद्यार्थी व ११ वी, १२ वी (सायन्स) मुले व मुली यांच्यासाठी आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने यशस्वी संघासाठी रोख रक्कम व प्रशस्तीपत्र अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मुले प्रथम पारितोषिक 7777-/ रुपये रोख रक्कम व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 4444/- रुपये रोख रक्कम आणि चषक तसेच मुलींमध्ये प्रथम पारितोषिक 4444/- रुपये रोख रक्कम व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 3333/- रुपये रोख रक्कम व चषक तसेच Best Rider साठी ओम फुटवेअर उंडाळे यांच्याकडून शूज गिफ्ट मिळणार आहे.  

या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बारावी सायन्स जुनिअर कॉलेज व पॉलिटेक्निक महाविद्यालये सहभागी होणार आहेत. विभागातील छोट्या उद्योजकांनी या स्पर्धेत प्रायोजक चे योगदान दिले आहे.

 सहभागी खेळाडूंना कराड पासून बसची सोय केलेली आहे.

 सदर स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे सामन्यांमध्ये फक्त मर्यादित प्रवेश शिल्लक आहेत. विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशासाठी स्पोर्ट्स इन्चार्ज दिपक पवार मो.नं.8855006595 यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पोर्ट्स कमिटीचे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले आहे. या स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक Y MAX POWER SYSTEMS, ICHALKARANJI यांचेकडून तर द्वितीय पारितोषिक प्रियदर्शनी प्लायवुड अॅन्ड हार्डवेअर मॉल, कराड यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे.तसेच जय इन्फोटेक, सोलापूर, कांती स्टोअर्स कराड, श्री इन्फोटेक मलकापूर, कलासंगम ड्रेसेस कराड,सिध्दनाथ स्किल डेव्हलपमेंट सेंटर विद्यानगर, राधाकृष्ण वस्त्र भांडार, उंडाळे, जाधव ट्रेडर्स कराड. विशाल ऑफसेट, उंडाळे यांनीही या स्पर्धेसाठी सहकार्य केले आहे.

या स्पर्धेसाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.