कुंभारगांव जिल्हा परिषद शाळेत हळदी कुंकू समारंभ व चिमुकल्यांचा भरला बाल बाजार.


   कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगांव ता पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नं 1 या शाळेत हळदी कुंकू समारंभ व शाळेतील चिमुकल्यांच्या  बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या ऑफिस मध्ये सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून उपस्थित पालक महिला वर्ग यांच्यात हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी उपस्थित पालक महिला वर्ग, ग्रामस्थ यांना मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात शाळेतील  विद्यार्थ्यांनाचा बालबाजार भरवण्यात आला होता.पहिली ते चौथी पर्यंत असणारी ही केंद्र शाळा उपक्रमशील शाळा  म्हणून नावाजली जाते या शाळेतील विद्यार्थ्यांकडून भरवलेल्या बाजारात शिक्षक, शिक्षिका,  पालक, ग्रामस्थ यांनी भाजी पाला खरेदीचा मनमुराद आनंद घेतला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देवाण -घेवाणीतुन ज्ञान हा उद्धेश समोर ठेवून प्रत्यक्षात व्यवहारज्ञान बाजारातून कसे मिळते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. नाणी, नोटा, पैसे रुपये पैशाचा दैनंदिन जीवनातील व्यवहार तसेच वजन, मापे किलोग्रॅम ने वजन करून वस्तू देणे हे समजले. या व्यवहारातील नफा तोट्याचे   व्यवहारज्ञान समजले.               



या बाजाराचे नीटनेटके नियोजन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला विकास चव्हाण, शिक्षिका अनुराधा शिवाजी आवळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींच्या  मुख्याध्यापीका सुजाता वसंतराव हारुगडे, शिक्षक विजय लोकरे दोन्ही शाळेचे  व्यवस्थापन समिती अध्यक्षा वर्षा नितीन बागल व प्राजक्ता संदीप देवळेकर यांनी केले होते.