डोंगराला लागलेल्या आगीत गवताची गंज व वनसंपदा जळून खाक.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
रामिष्टेवाडी तालुका पाटण येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे तीन हजार गवतांच्या पेंड्या असलेली गंज व त्याचबरोबर डोंगरावर असणारी वनसंपदा जळून खाक झाली आहे. गवताची गंज जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.वनवा पेटत गेल्यामुळे डोंगरावर असलेली वनसंपदाही जळून खाक झाली आहे.
               याची झळ वन्य प्राण्यांसह पशुपक्षांना बसणार आहे. पाटण तालुक्याला निसर्गाचा अनमोल ठेवा मिळाला आहे घनदाट झाडी, डोंगर दऱ्याचा हा परिसर त्यामुळे या विभागात वनसंपदा, वनऔषधी वनस्पती येथे सापडतात त्यामुळे निसर्गाने आणि वनसंपदेने समृद्ध तालुका म्हणून पाटण तालुक्याची वेगळी ओळख आहे मात्र ही ओळख भविष्यात नामशेष होणार नाही याची दक्षता जनतेने घेणे काळाची गरज आहे त्याचबरोबर वनविभागाने सुद्धा जनतेत जनजागृती करण्याचे काम हाती घेऊन वणवे लागू नये यासाठी कठोर पावले उचलण्याची व वणवे लावणाराच्यांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.                         
________________________________
डोंगराला लागलेल्या आगी मुळे शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी गवताची गंज लावली होती परंतु या डोंगरातील वणव्यामुळे गवताची गंज जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच वनसंपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वणवे रोखणे आवश्यक आहे.                             
बजरंग रामिष्टे , पोलीस पाटील रामिष्टेवाडी.
________________________________