नवी मुंबई येथील सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

पत्रकार भिमराव धुळप यांना सेवारत्न पुरस्कार जाहीर.



मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने विद्यार्थी स्नेहसंमेलनानिमित्त सालाबादप्रमाणे देण्यात येणाऱ्या सामाजिक बांधिलकी सुयश पुरस्कार २०२४ करिताचे राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी नुकतेच जाहीर केले.संस्थेच्या वतीने विविध उपक्रम देखील संस्थेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतात.

 पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रांतील मानकरी मध्ये धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भिमराव हिंदुराव धुळप यांना त्यांनी पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यात देखील उत्तम काम केल्याबद्दल त्यांना सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे,त्याचबरोबर दैनिक लोकमतचे पत्रकार नामदेव मोरे,शिवव्याख्याते रवींद्र पाटील सर, सुधीर थळे(क्रीडा), रामचंद्र संकपाळ,सौ अलका संकपाळ(गुरुवर्य-गुरुजन),प्रताप महाडीक(युवा प्रबोधन),सौ निकिता पाटील,जगन्नाथ पाटील(शिक्षण सेवारत्न),आर.पी.एस.अधिकारी- अमोगसिद्ध पाटील(मुंबई),शितलकुमार शिंदे(पनवेल),बबनराव संकपाळ(सामाजिक सेवा),कु.मानसी गोरखनाथ पोळ(युवा उद्योजक) असे मानकरी राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात येणार आहेत.

        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. संजीव नाईक (माजी खासदार ठाणे), संदीप नाईक,(मा. आमदार) सुभाष मोरे, ( कार्याध्यक्ष - शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य ),महेश म्हात्रे(जेष्ठ पत्रकार), गोरखनाथ पोळ ( जीवनदीप प्रकाशन तथा स्पिकर ) यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा शनिवार दि २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.वाजता. कोपरखैरणे, नवी मुंबई येथील सेक्टर ५ ते ८ मधील माथाडीचे आराध्य दैवत कै. आण्णासाहेब पाटील मैदान येथे संपन्न होणार आहे.ता सोहळ्यास पश्चिम महाराष्ट्रासह इतर बांधवानी देखील आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.