कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील विश्वकर्मा प्रतिष्ठान यांचे कडून सामाजिक उपक्रम राबवले जातात यातूनच आपण या समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासत कुंभारगांव येथील श्री लक्ष्मी देवी हायस्कुल मधील इयत्ता 10 वीतील गरजू व होतकरू तीन विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य करण्यात आले.
या वेळी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कराळे मॅडम, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संदीप पोतदार, नितीन पोतदार, नंदकुमार सुतार, वसंत सुतार, प्रा सचिन पुजारी उपस्थित होते.