कुंभारगांव येथील आनंदराव पुजारी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :            
कुंभारगांव ता पाटण येथील कै आनंदराव यशवंत पुजारी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी राहत्या घरी शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते अण्णा या नावाने परिसरात परिचित होते.

त्यांचेवर सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षाविसर्जन सोमवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता वैकुंठधाम कुंभारगांव ता.पाटण येथे होणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. ह.भ.प. पैं . कै संपतराव यशवंत पुजारी यांचे ते बंधू होत.