ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने ढेबेवाडी येथे 'भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .

या रक्त दान शिबिरात 155 रक्त दात्यांनी रक्तदान करून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. यानंतर सर्व पोलीस पाटील रक्तदाते यांचे ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.
ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API अभिजित चौधरी यांचे कडून रक्त दात्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.