तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सध्य स्थितीत सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदार यांना धान्य वाटपाचे मिळणारे तुटपुंजे कमिशन सध्याच्या महागाई चा विचार करता ते वाढीव करावे दरमहा ठराविक मानधन मिळावे,सध्याचे टू जे मशीन जुने असल्याने ते फाईव्ह जे करावे जुने मशीन असल्याने ते वारंवार बंद पडत असल्याने लाभार्त्याना धान्यासाठी हेलपाटे धान्य दुकानात मारावे लागतात यातून रेशन दुकानदार व धान्य लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग विनाकारण ओढवतात यासह इतर मागण्यासाठी एक जानेवारी पासून सातारा जिल्ह्यातील एक हजार 707 रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सातारा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटना, सातारा यांचे वतीने देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शेटे, पदाधिकारी मारुती किर्दत, संदीप भणगे, मच्छिद्र मोरे, हेमंत त्रिगुणे, किरण गायकवाड उपस्थित होते.