'जनसहकार'च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथील जनसहकार निधी लिमिटेड व नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले.

 या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष मारुतीराव मोळावडे , व्हा. चेअरमन अमोल मोरे, संस्थेचे संचालक प्रशांत महादेव पोतदार , आनंदा माने , मिलिंद ताईंगडे , महेश कोकाटे, काशिनाथ जाधव , सुनिल आडावकर , संदीप टोळे, संजय माटेकर , सुतार साहेब, सौ. सुरेखा नलवडे , सौ.निर्मला मोळावडे संस्थेचे सल्लागार जयवंत दिंडे, संजय पाटील, उमेश काळे, सुनील पांढरपट्टे, विलास गोडांबे (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण), विकास मोरे , प्रकाश बोत्रे , सतीश सांगावकर , जयेंद्र माने , संदीप मोहिते , तुकाराम धुमाळ , राजाराम चोरगे निवृत्ती करपे संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप मोळावडे तसेच तळमावले बाजारपेठेतील व्यापारी बंधू व सेवक वृंद आदी उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांनी दिनदर्शिकेची सुबक छपाई, परिपूर्ण माहिती पाहून चेअरमन मारुतीराव मोळावडे व जन सहकार परिवाराचे विशेष कौतुक केले

संस्थेची २०२४ ची दिनदर्शिका सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. तरी संस्थेच्या सर्व संचालक, सभासद व ग्राहकांनी दिनदर्शिका कार्यालयातून घेऊन जावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.