काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षणकार्यशाळा संपन्न.

 

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 तळमावले ता पाटण येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात ज्युनिअर विभागा मार्फत उद्योजकता प्रशिक्षण सन २०२३ - २४ कागदी बँग व नँपकिन बुके प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.                

ज्युनिअर विभागातील इंग्रजी विषयाचे प्रा सौ जे व्ही बाऊचकर (प्रशिक्षक) यांनी मुलींना प्रशिक्षण देऊन मुलींच्यात आत्मविश्वास वाढवून मुलींच्या मध्ये असलेल्या कौशल्याला संधी प्राप्त केली. याप्रसंगी मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण निर्माण झाले होते  

या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांचे मार्दर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन ज्युनिअर सांस्कृतिक विभागाअंतर्गत करण्यात आले होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा, डॉ यु ई साळुंखे (कॉमर्स विभाग प्रमुख) प्रा, बी एस सालवाडगी, प्रा, डॉ जे यु मुल्ला (ग्रंथपाल), प्रा, प्राजक्ता शिंदे मँडम, प्रा, स्नेहल पवार,प्रा, संजिवन पिसाळ, प्रा कु प्रतिक्षा कदम,उपस्थित होते. तसेच प्रा डॉ संभाजी नाईक (सिनियर स्टाफ सेक्रेटरी, प्रा आर एस जाधव (ज्यु.स्टाफ सेक्रेटरी), प्रा डॉ विक्रांत सुपूगडे, प्रा सी जी पुटवाड, प्रा सुनील कुंभार, प्रा श्रीराम बी ए, प्रा संभाजी पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात प्राचार्य डॉ अरूण गाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी यांनी केले व आभार प्रा बी एस सालवाडगी यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.