युवा शेतकरी विजय काळे यांचा दिल्लीत गौरव.

'मेलेनियर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराणे सन्मानित.



ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी विभागातील मालदन (ता. पाटण) गावचे सुपुत्र व कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे संपर्क शेतकरी विजय पतंगराव काळे यांना दिल्ली येथे 'मेलेनियर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

विजय काळे यांनी बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन केली असून, नोकरीच्या वाटा न धुंडळता आपल्या शेतीविषयक ज्ञानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत, तसेच अन्य उत्पादनांचा निर्मिती उद्योग मालदन गावी सुरू करून ते यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांच्या रॉयल गांडूळ खत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खत, वर्मिवॉश व पूरक औषधांची निर्मिती होत असून, त्याद्वारे सेंद्रिय शेतीची एक मोठी चळवळ उभी राहिली आहे. शेतीविषयक सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक शेतकरी श्री. काळे यांच्याकडे येत असतात. अनेक कृषी शास्त्रज्ञ प्रकल्पाला भेटी आहे. त्यांच्या आतापर्यंत विविध व तज्ज्ञांनी त्यांच्या देऊन कौतुक केलेले कार्याची दखल घेत पुरस्कारांनी त्यांना आहे गौरविण्यात आले.

नुकतेच केंद्रीय कृषी आणिकिसान कल्याण मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांच्यामार्फत गांडूळखत निर्मिती प्रचार व प्रसार या क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना दिल्ली येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील सर्व जिल्ह्यांतून या पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशील व युवा शेतकऱ्यांचे नामांकन मागवण्यात आले होते. कालवडे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विजय काळे यांचा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला होता. कल्याणी गोरक्षण ट्रस्टचे ट्रस्टी गौरीशंकर कल्याणी, रोहिणी कल्याणी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर आदींसह अधिकारी, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.