ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चा गलमेवाडी घाटात अपघात.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 रयत साखर कारखान्यासाठी कुंभारगांव, ढेबेवाडी विभागातून ट्रॅकटर ट्रॉली च्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाते मालदन येथील ऊस कारखान्यावर पोहच करून ट्रॅकटर येवती मार्गे येत असताना गलमेवाडी घाटातील पहिल्या वळणावर ट्रॅकटर क्र, MH 10 B 2908 या ट्रॅक्टर  चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकटर रस्ता सोडून रस्त्याच्या राईट साईड नाल्यात पलटी झाला. यावेळी ट्रॅकटरच्या मागील बाजूला ट्रॉलीची पिन निघाल्याने दोन्ही ट्रेलर रस्त्या वरून डाव्या बाजूला खोल सुमारे 100 ते 150 फूट दरीत कोसळली सुदैवाने ट्रॅकटर चालक यातून बचावला या घटनेची माहिती ऊस वाहतूक कंत्राटदार यांना समजल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले व अपघाताची माहिती व पाहणी करून क्रेनला पाचारण करून क्रेनच्या साह्याने खोल दरीत पलटी झालेले ऊस वाहतुकीचे ट्रेलर वरती काढण्यात आले. या अपघातात ट्रॅकटर व ट्रेलर चे मोठे नुकसान झाले आहे असे अपघात पुन्हा होऊ नये या साठी भरधाव वेगाने ट्रॅकटर ड्रॉयव्हींग करणाऱ्या व मोठ्या आवाजात रात्रीच्या वेळी वस्तीच्या ठिकाणी ट्रॅकटरवरील स्पीकर साऊंडिंग कमी असावे या साऊंडचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अश्या प्रकारचे साऊंडिंग करणाऱ्याना कारखान्याच्या संबंधित विभागाने सक्त सूचना केल्या पाहिजेत अशी मागणी जनतेतून होत आहे.