बिबट्याचा शेतकऱ्या सह शेळीवर हल्ला

कुंभारगांव येथील जांभूळवाडी माळ शिवारातील थरकाप उडवणारी घटना; सुदैवाने शेतकरी बचावला, एक शेळी ठार.                   


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगांव जांभूळवाडी ता.पाटण येथील घटना, जांभूळवाडी येथील शेतकरी खाशाबा दत्तू मोरे आपल्या शेळ्या माळशिवारात चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान एका शेळीला आपल्या खिशातील मके चारत असताना अचानक लिंबाच्या झाडावरून बिबट्याने त्याच्या दिशेने झेप घेतली यावेळी खाशाबा मोरे यांची भंबेरी उडाली यावेळी ते स्वतःला सावरत बाजूला झाले परंतु शेजारी उभ्या असणाऱ्या शेळीवर त्यांच्यासमोर बिबट्याने हल्ला चढवला व शेळीला तोंडात घेऊन डोगंराच्या दिशेने पळत असताना खाशाबा मोरे व अन्य शेतकरी यांनी आरडाओरडा केला यादरम्यान बिबट्याने तोंडातली शेळी तिथे सोडून डोंगराकडे धूम ठोकली या सर्व घटनेची माहिती सचिन सुर्वे यांनी मोबाईल वरून वनविभागाचे वनरक्षक आशिष पाटील यांना दिली.
 यावेळी वनरक्षक आशिष पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीचा पंचनामा करून शेळीला दफन करण्यात आले.                 

या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांच्यात मात्र प्रचंड दहशत व भिती वाढली आहे.