डॉ.अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून विंगला गावठाण जोड रस्त्यासाठी ५० लाख मंजूर


कराड: निधी मंजूर झाल्याबद्दल डॉ.अतुल भोसले यांचा सत्कार करताना अजित खबाले, सचिन पाचुपते, राजेंद्र खबाले, जयवंत माने, महादेव पाटील, विकास माने, जयवंत खबाले, निवास गरूड व ग्रामस्थ.

विंग|कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून ५० लाख रूपये विंग येथील पाणंद जोड रस्ता दुरूस्तीसाठी मंजूर झाले आहेत तर जिल्हा परिषद शाळा दुरूस्तीसाठी ५ लाख असे एकूण ५५ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस अतुल भोसले यांचे विशेष प्रयत्नातून त्यास मंजूरी मिळाली आहे. 

कराड-ढेबेवाडी रोड ते  विंग गावठाण साधारण 1 किलोमीटरचा जोड रस्ता आहे. गावठाणला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून त्या रस्त्याची नोंद आहे. कराडला तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्याच रस्त्याचा सर्रास वापर सर्वजण करत होते. यापुर्वी तासातासाला बस फेऱ्या त्यावरून सुरू होत्या. कालांतराने त्या बंद पडल्या. मात्र अलिकडे रस्त्याची मोठी दुरावस्था होऊन तो दुर्लक्षित झाला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने त्याकडे अणखी दुर्लक्ष होऊन दुरावस्थेत एकप्रकारे भरच पडली. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौऱ्यावर असताना डॉ.अतुल भोसले अणि विंगचे उपसरपंच सचिन पाचुपते यांनी त्यांची भेट घेतली होती व पत्राद्वारे रस्ता दुरस्तीसाठी निधीची मागणी केली होती. 

उपसरपंच सचिन पाचुपते यांनी या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. राज्य पुरवणी अर्थसंकल्पातून रस्ता दुरूस्तीसाठी ५० लाख रूपये खर्चाचा निधी मंजूर झाला आहे. रस्ता खडीकरण डाबंरीकरण अणि दुतर्फा आरसीसी गटर असे नियोजन आहे. हा रस्ता दुरूस्तीसाठी मंजूर झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. तर या गवासाठी विविध विकास कामांसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे त्यामधे जिल्हा परिषद प्राथमीक शाळेकडे जाणाऱ्या रस्ता दुरूस्तीसाठी १५ लाख, शाळा खोल्या दुरूस्तीसाठी ५ लाख ७० हजार रूपये असा निधी मंजूर झाला आहे तर प्रस्तावित आरोग्य उपकेंद्रासाठी ३ कोटी, सार्वजनिक नळपाणी योजना सोलर सिस्टीमसाठी ६० लाख निधी मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे उपसरपंच सचिन पाचुपते यांनी दै.कृष्णाकाठ शी बोलताना सांगितले.