विकास नागरी पतसंस्था पारदर्शक कारभाराने जनतेच्या विश्वासाला पात्र: डाॅ.दिलीप चव्हाणनवी मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगावचे सुपुत्र विकास सावंत, कै निवास सावंत,आण्णासो निवडुंगे यांनी मुंबई येथून सहकारात पदार्पण केले. तालुक्यातील चाकरमान्यांसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या संकटांत मदत होण्यासाठी छोट्या उद्योग व्यवसायाला आर्थिक पुरवठा करून युवकांना स्वावलंबी करण्यासाठी सहकारातून विकास नागरी पतसंस्था सुरू केली व त्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला, सहकारातून काहीतरी करावे या हेतूने प्रेरित होऊन 21 जानेवारी 2000 साली विकास नागरी पतसंस्थेची स्थापना केली संस्थेने अल्पावधीत पारदर्शक कारभाराने जनतेचा विश्वास संपादन केला या संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद यांचे बहुमोल योगदान व जनतेचा मिळणारा भरभरून प्रतिसाद या जोरावर या संस्थेने सहकारात एक वेगळी उंची गाठली आहे.

असे प्रतिपादन बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक डॉक्टर दिलीपराव चव्हाण यांनी केले.

संस्थेच्या नवी मुंबईतील घणसोली शाखेचा शुभारंभ डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी सहकार सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेचे हितचिंतक सभासद ठेवीदार उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब निवडुंगे म्हणाले या संस्थेचे मुख्य कार्यालय मस्जिद बंदर येथे असून तळमावले येथे 2 री शाखा व आज घणसोली येथील तिसऱ्या नवीन शाखेचे उदघाटन झाले. असून या संस्थेचे एकूण सभासद 3300 असून, 14 कोटी ठेवी, 13 कोटी 10 लाख कर्ज, 3 कोटी 62 लाख गुंतवणूक, 1 कोटी 50 लाख निधी, एकूण व्यवसाय 27 कोटी 10 लाख, निव्वळ नफा 10 लाख 11 हजार असून संस्थेतर्फे विविध योजना राबवून संस्थेमार्फत सभासदांना गुंतवणुकीसाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या संस्थेत तज्ञ अनुभवी स्टाफ आणि संपूर्ण संगणकीकरण असल्यामुळे संस्थेच्या कारभारात अधिक तत्पर व पारदर्शकता आलेली आहे त्या मुळे सहकारात एक विश्वाहार्य संस्था म्हणून विकास नागरी सहकारी पतसंस्थेची स्वतंत्र ओळख आहे.

 या संस्थेचे संस्थापक, सेक्रेटरी विकास सावंत यांचे मार्गदर्शना खाली या संस्थेचे अध्यक्ष आण्णासो निवडुंगे, उपाध्यक्ष संदेश सावंत, संचालक मंडळ, महाव्यवस्थापक दादासो करपे काम करत आहे या संस्थेच्या उदघाटन प्रसंगी विविध संस्थेच्या मान्यवरांनी संस्थेला भेटी देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यामध्ये - नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका दमयंती आचरे,समाजसेवक कृष्णा पाटील, साईराज काे-ऑप क्रेडिट साेसायटी लि., मुंबई चे चंद्रकांत चाळके, देवांग सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई तानाजी तोडकर, -गाेविंद सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई विकास तोडकर, समाज सेवक सुभाषभाऊ माेरे, समाजसेवक सुनील मस्कर, दि, वांगव्हॅली काे-ऑप.क्रेडिट साेसायटी लि.,मुंबई सुभाष बावडेकर, शिवराज सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई मारुती शिरसट, शिराळा काे-ऑप. क्रेडिट साेसायटी लि.,मुंबई चे बबनराव चिचोलकर, जागृती काे-ऑप.क्रेडिट साेसायटी, मुंबई कृष्णात जाधव, तारुख सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई विजय देसाई, ओमसाई काे-ऑप. क्रेडिट साेसा.लि,चे बाबासो जाधव, श्री निनाईदेवी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई चे आबासो शेडगे, श्री आधार सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई चे रामचंद्र कोळेकर, 

 पोलीस इन्स्पेक्टर तानाजी करपे, संजय माटेकर, उधोजक सुनील चाळके, निवासशेठ माेरे,युवा उद्याेजक संदेश केसरे, शिवसेना शाखाप्रमुख मानखुर्द बाळासो पवार,

व्यवसायिक अशाेक पाेतेकर,संचालक - समर्थ काे-ऑप. क्रेडिट साेसायटी, मुंबईचे विजय जाधव, व्यवसायिक शशिकांत चाेरगे, अजय पवार,शामरावशेठ काेळेकर, तसेच सहकार, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील विविध मान्यवर संस्थेच्या शाखा उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.