मानेगाव जवळ घारेवाडी ची युवती अपघातात ठार

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कार आणि टुव्हीलर च्या अपघातात मानेगाव  जवळ घारेवाडीची युवती ठार झाली या अपघातात तिची बहीण व भाऊ जखमी झाले आहेत. हा अपघात ढेबेवाडी मार्गावर मानेगाव जवळील कुंभारगांव फाट्यावर काल सायंकाळी साडेचार च्या सुमारास  झाला. रसिका शामराव घारे (वय वर्षे 19 रा घारेवाडी ता कराड )असे अपघातातील मृत युवतीचे नाव असून पोलिसांच्या माहिती नुसार घारेवाडी येथील रसिका घारे गुरुवारी सकाळी आपल्या भाऊ बहिनी सोबत कुंभारगांव विभागातील गलमेवाडी येथे आजोळी गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून  घारेवाडी कडे परतत असताना मानेगाव कुंभारगांव फाट्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. कराड कडून तळमावले दिशेने निघालेल्या कार व दुचाकी यांच्यात धडक झाल्याचे सांगण्यात आले अपघाता नंतर ये-जा करणाऱ्या वाहन चालक व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

या अपघाताची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, प्रशांत चव्हाण, माणिक पाटील, विकास सपकाळ आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना प्रथम तळमावले येथील खाजगी रुग्णालयात आणि तेथून कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात मृत पावलेली रसिका घारे हीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात केल्या नंतर रात्री मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.