ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मालदन व पानवळवाडी येथील अनेक विकास कामांना मंजुरी.


मालदन| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असणारे गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन काम करणारे पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते,पुल, वीज, नळपाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचवली आहेत. 

पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.

 नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

या वेळी मालदन ग्रामपंचायतीसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. या मुळे अनेक प्रलंबित असलेल्या कामांना आता वेग येणार आहे. मालदन ते पानवळवाडी रस्त्यासाठी 40 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत तर पानवळवाडी जिल्हा परिषद शाळा ते खळे पोहोच रस्त्यासाठी 15 लाख रु निधी देण्यात आला आहे व त्याच बरोबर पानवळवाडीमध्ये गणेश मंदिरासमोर कोयना भूकंप निधीतून सभामंडप बांधण्यासाठी 12 लाख रुपये निधी देण्यात आला आहे . येत्या काही दिवसातच या मंजूर विकास कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती मालदन चे उपसरपंच जोतिराज काळे यांनी दैनिक कृष्णाकाठशी बोलताना दिली. या विकास कामास मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची भविष्यातील गैरसोय दूर होणार आहे त्यामुळे मालदन, पानवळवाडी येथील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई व उपसरपंच जोतिराज काळे यांचें विशेष आभार मानले.