चेंबूरच्या घाटले गांवदेवी क्रीडांगणावर भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा: चेंबूरमधील घाटले गांवदेवी क्रीडांगणामध्ये मरूमाता क्रीडा मंडळ व मरुमाता उत्सव मंडळाच्यावतीने भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. परिसरातील बहुसंख्य क्रिकेट संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. 

हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी स्थानिकांसह आजूबाजूच्या वॉर्डातील क्रिकेट शौकीन आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले.या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष व वॉर्ड क्रमांक १५३ चे लोकप्रिय माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते पार पडला.स्पर्धेतील अंतिम विजयी संघ साई इलेव्हन व उपविजेता संघ सह्याद्री क्रीडा मंडळ यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.या क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश ससे,रवी शेलार, अजय मयेकर,रोहन पाटील, प्रकाश बेहरे व मंडळाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.