उंडाळ्यात १५ गुंठ्यांत ४१ टन उसाचे उत्पादन ; शेतकरी जगन्नाथ माळी यांचा यशस्वी प्रयत्न


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
उंडाळे येथील शेतकरी जगन्नाथ माळी यांनी पंधरा गुंठे क्षेत्रात उसाचे 41 टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. 
याबाबत अधिक माहिती देताना श्री माळी म्हणाले वडील (कै) सदाशिव माळी यांच्याकडून शेतीचे बाळकडू मिळाले, आई अनुसया माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शेतीत विविध पिके घेण्याचा प्रयत्न आहे. उसाच्या विक्रम उत्पादनासाठी प्रथम मेढरे बसवली त्यामध्ये पाच टन मळी टाकली. नंतर रोटर मारून सव्वाचार फुटी सरी पाडली. एक जूनला ८६०३२ या वाणाची लागण केली. सुरुवातीला उसाच्या भूड्यावर भुईमूग टोकणी केली होती. यामध्ये पाच पोती भुईमूग उत्पादन मिळाले. सुमारे 500 किलो घेवड्याचे उत्पन्न मिळाले. हे करत असताना ऊसाची संख्या मेंटेन करून उसाची उंची व जाडी यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले 30 ते 45 कांडयावर आला. ऊसाला त्याची जाडीही चांगल्या पद्धतीने राहिली ऊस फोडणीच्या वेळी योग्य पद्धतीने खताचा डोस दिला सुरूवातीला गन्ना मास्टर च्या दोन अळवणी व दोन फवारण्या केल्या. .तसेच कृष्णा कारखान्याची जैविक औषधे दिली. पाट पाणी पद्धतीने पाणी दिले. वादळी वाऱ्यामुळे ऊस काही प्रमाणात पडल्याने उतारा थोडा कमी झाला अन्यथा उत्पन्न आणि वाढले असते. अवघ्या पंधरा गुंठ्यात 41 टन ऊस मिळाला यासाठी कुटुंबातील आई अनुसया, पत्नी मंजुषा, मुलगा निखिल, मुलगी निकिता यांची साथ लाभली. यासाठी कृष्ण साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, सूरज साळवी, अमोल पाटील, महेश बर्गे, आकाश पाटील, यासह तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, कृषी पर्यवेक्षक बाबासो तोरणे, मंडल अधिकारी सुनील ताकटे यांचे मार्गदर्शन लाभले.