पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी आदरणीय माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. या दिवशी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा हे परगावी असल्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शिक्का मेन्शन पाटण येथे उपलब्ध असणार नाहीत. मात्र पुढील वर्षी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादांचा वाढदिवस भव्य कार्यक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन आत्तापासूनच केले जाणार आहे. अशी माहिती पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाटण येथे उपस्थित न राहता आपआपल्या गावांमध्ये समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवावेत व वाढदिवस साजरा करावा असे आवाहन पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार यांनी पत्रकार द्वारे केले आहे.