श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयास स्टार एज्युकेशन पुरस्कार.


घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयास महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व Education Supply Franchise Expo  (ESFE) या संस्थेमार्फत कराड तालुक्यातील Best private college या मानांकनासहित  2023 मधील STAR EDUCATION AWARD  देऊन नुकताच गौरव करण्यात आला या संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

महाविद्यालयास सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या महाविद्यालयाची शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे अशा महाविद्यालयास हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते दिला जातो. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने या महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई येथे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी उपस्थित होते.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग, बी.फार्मसी, डी. फार्मसी व ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयास महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व ESFE या संस्थेमार्फत Best College मानांकनासहित STAR EDUCATION AWARD - 2023 मिळाल्याबद्दल सर्व प्राचार्य, स्टाफ व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.