ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुसूर (ता. कऱ्हाड) येथील एका युवकाचा ढेबेवाडीपासून जवळच असलेल्या वांग नदी शेजारी काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून खून झाला. ऋतुराज दिलीप देशमुख (वय ३१, रा. कुसुर ता. कराड) असे मृताचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून ढेबेवाडी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी स्थितीत पडलेला होता.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, तसेच पाटण तालुक्यातील विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.