मंदुळकोळे खुर्दच्या उपसरपंचपदी हिंदुराव पाटील गटाचे संजय लोहार यांची बिनबिरोध निवड तर उमादेवी भोई यांनी स्विकारला सरपंच पदाचा कार्यभार.


मंदुळकोळे खुर्द ता.पाटण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय लोहार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना हिंदुराव पाटील, समवेत अभिजीत पाटील, आत्माराम कदम व इतर.

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
मंदुळकोळे खुर्द ता.पाटण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय लोहार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.नवनिर्वाचित उपसरपंच, सरपंचाचा सत्कार काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला. 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, खरदे विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम,सोसायटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, माजी सरपंच बी.एम. पाटील, सतिश कापसे,अरविंद कुंभार, अविनाश साळुंखे, वसंतराव पाटील, दादासो साबळे,तसेच नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

   महिन्यापूर्वी मंदुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीची निलडणुक झाली या निवडणुकीत काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांच्या गटाने विरोधकांना चारीमुंड्या चित करुन ८ /० अशा मोठ्या मताच्या फरकाने ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता कायम राखली. ग्रामपंचायत स्वतंत्र होवून ३० वर्षे झाली तेंव्हापासून या ग्रामपंचायतीवर हिंदुराव पाटील गटाचे वर्चस्व आहे.

   यावेळी बोलताना हिंदुराव पाटील म्हणाले मंदुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक केवळ विरोधाला विरोध म्हणून लादली. यामध्ये विरोधी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट गेलं. हे गाव गेली ३० वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या पाठशी कायम राहिले आहे.ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून विरोधकांना या गावाने थारा दिला नाही.या गावात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत आणि येथून पुढेही या गावाच्या विकासासाठी आपण कमी पडणार नाही असे म्हणाले.

  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण कुंभार यांनी काम पाहिले.ग्रामसेवक मस्के यांनी प्रोसिंडींग वाचन केले.दादासो साळुंखे यांनी स्वागत केले तर रुपेशकुमार भोई यांनी आभार मानले.