नवी मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
साईराज पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत चाळके हे सहकार व सामाजिक क्षेत्रात प्रभावी पणे काम करणारे व्यक्तिमत्व असून गावाकडील लोकांचे राहणीमान उंचावे त्यांना वेळप्रसंगी आर्थिक पाठबळ मिळावे या साठी साईराज को, ऑपरेटिव्ह सोसायटीची मुंबई या ठिकाणी स्थापना केली त्याचा आज शाखा विस्तार घणसोली या ठिकाणी होत आहे हि एक कौतुकाची बाब आहे
असे प्रतिपादन सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
साईराज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची नुकतीच घणसोली येथे नवीन शाखेचा शुभारंभ संपन्न झाला. या नवीन शाखेचे उद्घाटन नामदार शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी ते उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, अशोक माटेकर,डी, आर, पाटील, सुरेश पवार, सुभाष बावडेकर अमित शेटे, जया अलिमचंदानी, प्रकाश बोत्रे, अंकुश सावंत, संतोष तोडकर, शितल कचरे, सूर्यकांत वाघमारे, सुरेश सपकाळ, दिपक रामिष्टे, मारुती सावंत, राहुल पेंढारकर,संदीप टोळे, तानाजी चाळके, वसंत हारुगडे, दत्तात्रय चोरगे, तानाजी सूर्यवंशी, प्रविण निवडुंगे, मारुती निवडुंगे, राजेश चव्हाण, ए, के,पाटील आदी मान्यवर उपस्तित होते.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना ना. शंभूराज देसाई म्हणाले या संस्थेची 20 कोटीची उलाढाल असून 11 कोटी कर्ज वितरण केले असून 15 कोटी ठेवी आहेत सभासदाच्या विश्वासास पात्र राहून या संस्थेचे कामकाज चालू आहे.
पाटण तालुक्यातील अनेक लोक, कुटुंबे कामानिमित्त मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना सुलभ रितीने त्यांच्या गरजेसाठी उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळावे त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम साईराज को, ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे गरजूंना तर मदत होतेच पण छोटे मोठे उद्योजक ही यातून निर्माण होत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. या नवीन शाखा विस्तारास माझ्या शुभेच्छा. यावेळी चंद्रकांत चाळके यांनी ना. शंभूराज देसाई, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले व इतर मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले.
या कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, व्यावसायिक, नवी मुंबई व पाटण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.