काळंबादेवी महिला पतसंस्थेचा 17 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

पारदर्शक कारभार व सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी महिला पतसंस्था: सौ सारिका पाटणकर.

 
काळंबादेवी महिला पतसंस्थेने महिलांचे जीवनमान उंचावण्याचे फार मोठे काम केले आहे हि कौतुकाची बाब आहे.कुंभारगाव परिसरात आपल्या पारदर्शक कारभाराने जनतेचा विश्वास संपादन करून या संस्थेने सहकारात‌ वेगळी उंची गाठली आहे. असे प्रतिपादन कुंभारगावच्या सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी व्यक्त केले.

काळंबादेवी महिला पतसंस्थेचा 17 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला यावेळी त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

यावेळी संस्थेच्या चेअरमन सुजाता घाडगे,संस्थापक रमेश घाडगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे ठेवीदार, सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थितांना पुढे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या या संस्थेने महिला वर्गात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी महिला बचत गटांना अल्प व्याज दरात कर्ज पुरवठा करून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांना स्वावलंबी बनवून सक्षम करण्यासाठी ही संस्था सदैव प्रयत्न करत असते.

यावेळी संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक रमेश घाडगे म्हणाले काळंबादेवी महिला पतसंस्थेची स्थापना 17 वर्षा पूर्वी एका छोट्याश्या चोरगेवाडीत करून गोरगरीब कुटूंबातील महिलांना आर्थिक पतपुरवठा व्हावा या हेतूने प्रेरित होऊन केली होती आज या संस्थेला 17 वर्ष पूर्ण होत आहे आजपर्यँत सभासदानी ठेवलेला विश्वास यास पात्र राहून पुढील वाटचाल करत आहोत.           

          या वेळी संस्थेच्या चेअरमन सुजाता घाडगे म्हणाल्या या संस्थेचे चेअरमन म्हणून काम करीत असताना परिसरातील विभागातील महिलांना बरोबर घेऊन काम करत आहे महिलांना बचतीची सवय लागावी यासाठी सर्व संचालकांनी जनजागृती केली.

महिलांना संस्थेतर्फे विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या संस्थेत तज्ञ् अनुभवी स्टाफ आणि संपूर्ण संगणकीकरण असल्यामुळे या महिला पतसंस्थेची कुंभारगांव विभागात स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण झाली आहे.. तसेच या संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ, बचत गटा साठी नवं नवीन उपक्रम राबवून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो.                    

यावेळी काळंबा देवी महिला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सारिका पाटणकर, संस्थेच्या सर्व संचालिका, प्राणा फाऊंडेशन महिला, सभासद, ग्रामस्थ यांचे हस्ते करण्यात आले.

 तसेच या वेळी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  कुंभारगावच्या सरपंच सारिका पाटणकर यांनी सर्व महिलांना भेटवस्तू दिल्या. या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव वैशाली अरुण गूढेकर यांनी मानले.