मंद्रूळकोळे खुर्द ग्रामपंचायत मध्ये हिंदुराव पाटील यांच्या सत्ताधारी ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय.

 

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मंद्रूळकोळे खुर्द ग्रामपंचायत मध्ये पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांच्या सत्ताधारी ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनलने सर्व जागा जिंकून ८- o करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला यामध्ये सौ.उमादेवी रुपेश भोई या थेट सरपंच झाल्या असून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा खोटा प्रचार आणि हव्याशी वृत्तीचा या निवडणुकीतून पर्दाफाश केला आहे.

       मंद्रूळकोळे खुर्द गावची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते अभिजीत पाटील व नितीन भैया पाटील यांच्या नेतृत्वाखालील ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल व विरोधी कै. आ. अण्णासाहेब पाटील परिवर्तन पॅनेल अशी सरळ लढत झाली या परिवर्तन पॅनल बरोबर माथाडी शक्ती, पालक मंत्री शंभूराज देसाई गट आणि ए. पी. पाटील यांची राष्ट्रवादी अशी सर्व शक्ती एकत्रित येऊन लढत झाली. पण हिंदुराव बापू यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या सर्व विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभव करत सर्वच्या सर्व जागा जिंकून ८- ० ने ही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात दिली. मंद्रूळकोळे खुर्द गावची सत्ता स्थापनेपासून हिंदुराव पाटील यांच्या ताब्यात आहे. येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपला गड अबादीत राखून काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे.

       विजयानंतर कार्यकर्त्यांनी गावात विजयी मिरवणूक काढली यावेळी माजी उपसरपंच संजय लोहार म्हणाले हिंदुराव पाटील हे एक आदर्श नेतृत्व आहे त्यांनी या गावासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. या गावाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. या गावानेच त्यांना राजकारणात उभारी दिली असून हे गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व यापुढेही असणार आहे. विरोधकांनी खोट्या तक्रारी व खोटा प्रचार केला यास मतदारांनी भीक घातली नाही मतदारांनी मताच्या पेटीतून त्यांना उत्तर दिले असून मोठा विजय प्राप्त केला आहे.

    मंद्रूळकोळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन दादासाहेब साळुंखे म्हणाले हिंदुराव बापू यांनी या गावाचा कायापालट केला. येथील सामान्य जनतेचे सुख दुःख आपलं मानून जिव्हाळ्याच नात जपल यामुळे येथे विरोधकांना थारा नाही हे या निवडणुकीतून दाखवून दिले आहे.

या निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या उमेदवार सौ. उमादेवी भोई, तसेच श्री राम वार्ड येथून सतिश कदम, सौ. कमल पाटील,श्री राम वार्ड मधून सौ. विनया पाटील, महादेव वार्ड मधून संजय लोहार, सौ.सारिका काटकर तसेच विठ्ठल वार्ड मधून हणमंत रोडे, सौ.सुनिता साबळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. या निवडणुकीत, ज्येष्ठ, तरुण व महिला कार्यकर्त्या यांनी भरपूर परिश्रम घेतले.