मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा:
संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित वर्ष १० वे सर्व भाविकांचे आराध्य दैवत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकजन हातात टाळ, मृदुंग, खांद्यावर वीणा आणि हाती पताका घेऊन पंढरपूर ला पायी जातात.परंतु ज्या भक्तांना पंढरपूरची पायी वारी करता येत नाही म्हणून गेली नऊ वर्षे संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने कार्तिकी एकादशी दिवशी दिंडीचे आयोजन करत असते.

यावर्षी सुद्धा गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दादरच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट पासून सकाळी ८.३० ला पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होईल त्याची सांगता श्री विठ्ठल मंदिर,रानडे रोड,दादर येथे होईल.
आषाढी कार्तिकीला भाविक अर्थात वारकरी श्रद्धापूर्वक प्रेमाने पंढरपूरला जाऊन श्री विठूरायाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आनंद लुटत असतात.तोच आनंद तोच उत्साह, फुलांची,रांगोळीची सजावट, भक्तासाठी जागोजागी अल्पोहार ठेवला जात असतो. यावेळो मोठ्या उत्साहाने हा सोहळा याची देही,याची डोळा भक्तांना बघायला मिळणार आहे.त्यामुळे या संधीचा लाभ मुंबईतील सर्व वारकरी बंधू तसेच भक्तांनी घ्यावा असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.