स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतिसंगम, कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यातील सहकार, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले. त्यांच्या नेतृत्वामुळे आपले राज्य प्रगतिपथावर आले. त्यांच्याच विचारांवर राज्यशासन काम करत आहे. त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच यावेळी पर्णकुटी येथे आयोजित भजन कार्यक्रमासही ना. शंभूराज देसाई उपस्थित राहिले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.