कुंभारगाव विकास सेवा सोसायटी मार्फत दीपावली चा आनंदाचा शिधा लाभार्त्याना वाटप.


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगाव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्यादये अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थीना दीपावली निमित्त आनंदाचा शिधा कोटा 324 किट प्राप्त झाले त्याचे लाभार्त्याना नूकतेच सोसायटी कार्यालयात वितरण करण्यात आले. 

यावेळी बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन, विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण, कुंभारगांव ग्रामपंचायतीचे उप सरपंच राजेंद्र चव्हाण, सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, संचालक,व दै कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, आनंदराव माटेकर,सोसायटीचे सेल्समन विलास मोरे, ईश्वर मोरे, अनिल डांगे उपस्थित होते.

आनंदाचा शिधा लाभार्थी या आनंदाचा शिधा निव्वळ 100 रुपया मध्ये पामतेल, साखर, रवा, मैदा, चनाडाळ, पोहे या 6 वस्तूचा समावेश असल्याने गोर गरीब असलेल्या लाभर्त्यांची दीपावली गोड होणार आहे यावेळी उपस्थित आनंदाचा शिधा लाभार्त्यानी शिधा घेण्या साठी सोसायटीत गर्दी केली होती यावेळी लाभार्त्यानी या शासनाच्या आनंदाचा शिधा बाबत समाधान व्यक्त केले

.