तात्या’ पुस्तकाच्या अभिप्रायाचे होणार ई-बुक

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
आपल्या आई-वडिलांचे ऋण आपण आयुष्यामध्ये कधीही फेडू शकत नाही इतके ते अनंत असतात. परंतू त्यांच्या प्रती आपण काही अंशी कृतज्ञता व्यक्त करु शकतो. ‘तात्या’ हे पुस्तक लिहून दिवगंत वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लेखी अभिप्राय स्वरुपात घेवून त्याचे ई-बुक करण्याचा संकल्प डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. तरी वाचकांनी आपला अभिप्राय शुक्रवार दि.15 डिसेंबर, 2023 पर्यंत पाठवावा. या अभिप्रायाचा समावेश ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक मध्ये करण्यात येणार आहे. अभिप्रायाचे ई-बुक हा साहित्य क्षेत्रात वेगळा उपक्रम असल्याचे मत डाॅ.डाकवे यांनी व्यक्त केले आहे. 

प्रकाशनपुर्व पुस्तक पोस्टर प्रकाशन, पुस्तकात क्यु आर कोडचा प्रभावी वापर, ओघवती काळजाला भिडणारी भाषा, सुप्रसिध्द व्याख्याते आणि लेखक प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांची कसदार प्रस्तावना, लेखाला साजेशी रेखाचित्रे, शेतात पुस्तकाचे प्रकाशन इ.तात्या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगता येतील. 

यापूर्वी बिग बाॅस फेम अभिनेते किरण माने, अभिनेते माधव अभ्यंकर यांनीही या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच ’तात्या’ पुस्तकाला राज्यस्तरीय स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर झाल्यामुळे या पुस्तकाच्या उत्कृष्टतेवर गुणवत्तेची मोहोर उमटली आहे.

हे पुस्तक उपेक्षित शेतकरी वर्गाचं नेतृत्व करणाऱ्या आणि आहे त्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना आपल्या मुलांना एक मार्गदर्शक बनून त्याला उत्तमातील उत्तम ‘माणूस’ म्हणून घडवण्यासाठी सतत मार्गदर्शन करणाऱ्या एका बापाची कहाणी आहे. 

‘तात्या’ या पुस्तकाची किंमत रु.150 असून त्याच्या खरेदीसाठी मो.9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी काही रक्कम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सामजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याचेही डाॅ.डाकवे यांनी सांगितले.

सदर ई-बुक चे अनावरण मंगळवार दि.9 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. तरी वाचकांनी आपले अभिप्राय लवकरात लवकर पाठवावेत असे आवाहन लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.