श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा उत्साहात व जल्लोषात संपन्न.

कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:       
कुंभारगांव ता पाटण येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा नुकतीच मोठया उत्साहात, जल्लोषात व शांततेत पार पडली. या यात्रेचे योग्य नियोजन यात्रा कमेटी, ग्रामस्थ यांनी केले होते. दोन दिवसाच्या होणाऱ्या यात्रेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 27 नोव्हेंबर सोमवारी सकाळी श्रीची काकड आरती व नवसाचे दंडस्थानाने यात्रेचाा प्रारंभ झाला. 

यावेळी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घेऊन अनेक भाविक भक्त यांनी दंडस्थान घेतले. यावेळी मंदिरात व मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता सायंकाळी 7 वा यात्रेचा भंडारा पार पडला. यावेळी महाप्रसादा चा लाभ घेण्यासाठी भाविक भक्त, ग्रामस्थ यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. रात्री यात्रा कमेटी व ग्रामस्थांकडून गावाच्या बाहेर परिसरातून आलेल्या देव, देवतांच्या पालख्या,सासन काठ्या चे स्वागत करण्यात आले. 

यावेळी डीजे च्या तालावर तरुणाईने एकच ठेका धरला होता. पालख्यांचे वाजत गाजत मंदिराकडे प्रस्थान झाले यानंतर लोकनाट्य तमाशा सुरु झाला. मंगळवारी सकाळी मंदिरातून सासण काठ्या, देवदेवतांच्या पालख्या छबिन्या साठी बाहेर पडल्या व छबिना पुढे मार्गस्त झाल्या या छबिना मिरवणुकीच्या पुढे भाविक भक्तांनी फटाक्याची अतिषबाजी करत भव्य स्वागत केले. या छबिना मिरवणुकीच्या वाटेवर या यात्रेतील देव, देवतांच्या पालख्याचे भाविक, भक्त सुवासिनी, माहेरवाशीण यांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत पालखीतील देव, देवतांना पंचारतीने ओवाळून साकडे घातले. 

या दरम्यान छबिन्यातील सासन काठ्या आकाशाकडे झेपावत तरुणाई यांनी या यात्रेत बेधूंद होत नाचुन आनंद साजरा केला व गुलालाची उधळण केली. 

या वेळी दै कृष्णाकाठ च्या यात्रा विशेष अंकाचे छबिना मिरवणुकीत मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, योगेश पाटणकर उपस्थित होते.

सर्व पालख्या मंदिरात विसावल्या नंतर दिवसाचा लोकनाट्य तमाशा सुरू झाला. सायंकाळी जंगी कुस्ती मैदान भरवण्यात आले होते त्या वेळी नामांकित कुस्ती मल्लाच्या कुस्ती पार पडल्या या वेळी यात्रा कमिटी, ग्रामस्थ, वैयक्तिक यांचे कडून कुस्ती मैदानात कुस्ती मल्लांना उतेजनार्थ बक्षिसे वाटण्यात आली. 

यावेळी कुस्ती मैदानात कुस्ती शौकीन यांनी गर्दी केली होती. विजयी  कुस्ती पैलवान यांना त्याचे मानधन, स्मृति चिन्न देऊन यात्रा कमेटी यांचे हस्ते गौरवण्यात आले.  

यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन विध्यमान संचालक दिलीपराव चव्हाण, सातारा जि,प, चे माजी सभापती संजय देसाई,कुंभारगांव ग्रा,पंचायतीचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, सदस्य किशोर चव्हाण, पाटण तालुका राष्ट्रीय युवक कॉग्रेस उपाध्यक्ष उदयसिंह चव्हाण, पाटण तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, सोसायटीचे संचालक जगन्नाथ कारंडे, दैनिक कृष्णाकाठ चे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते जयवंत चव्हाण, पोपटराव चव्हाण, युवराज चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कुस्ती मैदानात कुंभारगांव येथील संग्राम चव्हाण व शेंडेवाडी येथील ओंकार मोरे या दोन मल्लानी प्रतिस्पर्धी मल्लाला पहिल्या डावात चितपट करत कुस्ती मैदानात विजय मिळवला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विजय प्राप्त केल्या मुळे व नवीन पिढीत कुंभारगांव विभागात दोन कुस्ती मल्ल तयार झालेने परिसरातून त्यांचेवर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे व विभागात त्यांचे अभिनंदन होत आहे.

दोन दिवसाची ग्रामदेवतेची यात्रा उत्साहात, जल्लोषाल व शांततेत पार पडली या  यात्रे साठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.