समर्पण फौंडेशनच्या वतीने जिजाऊ वसतीगृहात दिवाळी फराळ वाटप

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. 

या दिवाळी सणाचे औचित्य साधत समर्पण फौंडेशनच्या वतीने कोळे ता.कराड येथील जिजाऊ वसतीगृहातील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, शशिकांत पाटील, विजय पवार, अक्षय भांडवलकर, सुनील भांडवलकर, प्रवीण कदम, महेंद्र चाळके, समीर नदाफ व जिजाऊ वसतीगृहातील अन्य उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम हया या समर्पण फौंडेशनच्या अध्यक्षा आहेत. चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत काम करत असलेल्या कविता यांनी अनाथ मुलांना दिलेल्या फराळ वाटपामुळे त्यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. समर्पण फौंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशाप्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.