उत्तमराव पांडुरंग साळुंखे यांचे दुःखद निधन.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मालदन तालुका पाटण गावचे सुपुत्र श्री. उत्तमराव पांडुरंग साळुंखे ( वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १९ नोव्हेम्बर २०२३ रोजी निधन झाले. ते आप्पा या नावाने सर्वांना परिचित होते. ते स्वर्गीय स्वातंत्रसैनीक पांडुरंग नारायण साळुंखे यांचे द्वितीय चिरंजीव आहेत. ते जुन्यातील ग्रॅजुएट असून त्यांनी २५ वर्ष मुंबई येथे नोकरी केली, नंतर शेती मध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांचा शांत संयमी व मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या दुःखद निधनाने मालदन गावावर शोककळा पसरली आहे.

मालदन येथील वैकुंठ धाम येथे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता रक्षा विसर्जन विधी होणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी ,दोन मुले आणि एक मुलगी, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव श्री. राजेश साळुंखे हे नवी मुंबई येथील यशस्वी उद्योजक आहेत.