जन सहकार च्या वतीने श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास टँकर सेवा अर्पण.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला सुरवात झाली आहे. या वेळी तळमावले ता. पाटण येथे जन सहकार निधी च्या वतीने दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी जन सहकारचे चेअरमन मारुतीराव मोळावडे, संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


वारकऱ्यांना दिंडी मार्गात मुबलक पाणी मिळावं यासाठी संस्थेच्या वतीने चेअरमन मारुतीराव मोळावडे यांच्या शुभ हस्ते पाणी टँकर सेवा अर्पण करण्यात आली. यावेळी जनसहकार निधी. लि. तळमावले चे संस्थापक / चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सल्लागार व व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुळे पायी वारीत सहभागी झालेल्या हजारो वारकरी बांधवांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.