काँग्रेस पक्षासाठी हिंदुराव पाटील यांचे मोठे योगदान : आ. पृथ्वीराज चव्हाण


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
पाटण तालुक्यात अतिशय संघर्षमय झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिंदुराव पाटील यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद आहे. पडत्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाला दिलेली साथ विसरून चालणार नाही, असे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. मंद्रुळकोळे खुर्द व मंद्रुळकोळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

आ. चव्हाण म्हणाले, हिंदुराव पाटील यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या कामाची पोहोचपावती देईल.

 हिंदुराव पाटील म्हणाले, तालुक्यात पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागळातील लोकांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे. पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे शेवटपर्यंत पक्षासाठीच काम करणार असून सत्तेत असो अथवा नसो सर्वसामान्य लोकांसाठी लढत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

अभिजित पाटील यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम, मंद्रुळकोळे सोसायटीचे उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, माजी सरपंच तुकाराम पाटील, माजी उपसरपंच अरविंद कुंभार, नवनिर्वाचित सरपंच उमादेवी भोई, सदस्य संजय लोहार, बाळासाहेब रोडे, सतीश कदम, विनया पाटील, कमल पाटील, सुनीता साबळे, सारिका काटकर, नथुराम सुतार, सुभाष ढेब, सुनंदा पवार उपस्थित होत्या.