पोलीस पाटील संतोष पवार व बजरंग रामिष्टे यांची तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरवात.

 

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पोलीस पाटीलांच्या मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी पोलीस पाटील संतोष पवार व बजरंग रामिष्टे तहसीलदार कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. 

           मानधनात वाढ करण्यासह ते महिन्याचे महिन्याला मिळावे यासह इतर विविध मागण्यासाठी आज गुरुवारपासून (ता१६) आमरण उपोषण सुरू झाले असल्याने ढेबेवाडी विभागातील शेंडेवाडीचे पोलिस पाटील संतोष पवार व रामीष्टेवाडीचे पोलिस पाटील बजरंग रामीष्टे आमरण उपोषनास बसले असून पाटण तालुक्यातील पोलिस पाटील साखळी उपोषनाने त्यात सहभाग नोंदविणार आहेत.

    शासन आणि गाव यामधील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील आपआपल्या गावामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. गेली पाच वर्षे झाली त्यांना असणारे तुटपुंजे मानधन आम्हा पोलीस पाटील यांना कधीच वेळेवर महिन्याचे महिन्याला मानधन मिळालेले नाही. सध्या काही महिन्यांपूर्वी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल, कंत्राटी शिक्षक इत्यादींचे मानधनात शासनाने वाढ केली परंतु पोलीस पाटील यांना मानधन वाढ आजूनही देण्यात आलेली नाही. सध्या असणारे मानधनही वेळेत होत नाही.

            पोलिस पाटलांचे मानधन वाढवावे यासह इतर प्रलंबित मागण्या संदर्भात वारंवार निवेदने देवूनही सध्याचे सरकार त्याचा गांभीर्याने विचार करत नाही.सध्याचे तुटपुंजे ६५०० मानधन नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत कधीच वेळेत महिन्याच्या महिन्याला मिळालेले नाही. तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह,मुलांचे शिक्षण याचा मेळ बसत नाही गेल्या सहा महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही.दिवाळी साजरी करणेही अवघड झाले आहे.याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दुपारपासून पाटण येथे तहसील व प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस आधीकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु राहणार आहे.

       -- -------------------------------------------------------------------आज पासून पोलीस पाटील यांच्या विविध मागणीसह पाटण येथे आमरण उपोषणास बसत असून

शासन प्रत्येक वेळी पोलीस पाटील ह्या घटकाला दुर्लक्षित केले असून यंदाची दिवाळी ही सर्व पोलीस पाटील यांना अंधारात गेली असून शासनाने गांभीर्याने या बाबतीत योग्य दखल घ्यावी.

        संतोष पवार,  पोलीस पाटील -शेंडेवाडी

   ---------------------------------------------------------------------