सचिन पाचुपते यांची सामाजिक बांधिलकी


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे युवा उद्योजक विंग ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाचुपते यांनी दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विंग ग्रामपंचायती मधील सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.

या वेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचारी बंधूंना मिठाईवाटप व पोशाख वाटप केले तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच सचिन पाचुपते म्हणाले, आपण सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावासाठी सगळे सण विसरून गावाची सेवा करत असता दिवाळी सारख्या मोठ्या सणात ही गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता इतर सर्व कामे आपण वेळेचे बंधन न ठेवता करत असता तुमच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडून छोटीशी दिवाळी भेट देत आहे ती आपण स्वीकारावी. आपल्याला गावाची सेवा करण्यासाठी अधिक बळ प्राप्त व्हावे आपले आरोग्य निरोगी राहावे व आपल्या जीवनात सुख समृद्धी लाभावी हीच या दीपावलीनिमित्त आपणास शुभेच्छा.

या वेळी कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी विंग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खबाले ग्रामपंचायत सदस्य, श्री.बाबुराव खबाले, श्री.विकास माने, ग्रामविकास अधिकारी , श्री किसन रॉंगटे अण्णासाहेब, तसेच सर्व कर्मचारी बंधू उपस्थित होते.