मलकापूर येथे विद्यार्थ्यांना आकाश कंदिल बनविण्याचे प्रात्यक्षिक संपन्न.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

      विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा व त्यांचे हस्त कौशल्य वाढावे, कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यालयाचे चित्रकलेचे शिक्षक राजेंद्र पांढरपट्टे व संगीत शिक्षक श्री शरद तांबवेकर यांनी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ.च.विद्यालय मलकापूर ता. कराडच्या पाचशे विद्यार्थ्यांना दिले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवगत असलेली सुप्त कला ही हस्त कौशल्य व नवनिर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचे चित्रकलेचे शिक्षक राजेंद्र पांढरपट्टे व संगीत शिक्षक श्री शरद तांबवेकर यांनी मांडले व विद्यार्थ्यांना दीपावली सण जवळ आला असून त्यानिमित्त लागणारे आकाश कंदील कसे बनवायचे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. मुख्याध्यापिका अरुणाकुंभार,उपमुख्याध्यापक ए.बी थोरात, पर्यवेक्षक बी.जी.बुरुंगले, सर्व शिक्षक, पालक कार्यक्रमास उपस्थित होते. राजेंद्र पांढरपट्टे यांनी प्रात्यक्षिकाचे नियोजन केले.