ना.शंभूराज देसाई यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य,वहया आणा.

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईं वाढदिवस नियोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन.पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.यंदा त्यांचा 57 वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा करण्याचे नियोजित आहे. वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ,फेटा देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: नामदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून त्यांचे दि.17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसानिमित्त भेट देताना पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता मतदार संघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.


             पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून शुभेच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते त्या हारतुऱ्यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावावी लागत असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणाऱ्या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या हेतूने वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी या अगोदरच केले आहे. त्यांचे या आवाहनाला मतदारसंघातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. हाच पायंडा लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांना भेट म्हणून मिळणाऱ्या वहया तसेच शालेय साहित्य हे मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून मतदारसंघात वाटप करण्यात येत असते. गत दहा वर्षापासून प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांचा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट स्वरुपात मिळणाऱ्या वहयांचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीही ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त भेट देताना वहया तसेच शालेय साहित्य दयावे, असे आवाहन पालमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांना केले आहे.