कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मौजे कुंभारगांव ता पाटण येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा सोमवार दि 27/11/2023 रोजी भर व 28/11/2023 रोजी खेळणे होणार असून 27 नोव्हेंबर रोजी पहाटे श्री ची काकड आरती ने सुरुवात होणार असून याच दरम्यान नवसाचे दंडस्थान याने सुरुवात होणार असून ते दिवसभर चालू राहील.
सायंकाळी 7 ते 10 देवीचा यात्रेचा महाप्रसाद भंडारा होणार असून याच वेळी मंदिरा शेजारील तळ्याच्या काठावर पणत्यां प्रज्वलीत केल्या जाणार आहेत. रात्री 11 वाजता कुंभारगांव वाडीवस्ती येथील देव, देवता पालख्या, सासनकाठी यांचे ग्रामस्थ, यात्रा कमिटी कडून भव्य स्वागत करून मंदिराकडे प्रस्थान होईल.
रात्री 12 वाजता वसंतराव वाडेकर कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे 28 नोव्हेंबर यात्रेचा मुख्य दिवसाच्या सकाळी 6 ते 11 या वेळेत 9 देव देवता पालख्या, सासन काठ्या यांचा छबिना भव्य मिरवणूक होणार असून सकाळी 11,30 वाजता दिवसाचा लोकनाट्य तमाशा दुपारी 3 वाजता भव्य जंगी निकाली मातीतील कुस्ती मैदान भरवण्यात येणार असून या कुस्ती मैदानात कुस्ती लावण्यासाठी इच्छुकांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.