सचिन पाचुपते यांची वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा
 विंग गावचे उपसरपंच युवा उद्योजक सचिन दादा पाचुपते यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला. कोळे येथील जिजाऊ वस्तीगृहातील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी जिजाऊ वस्तीगृह येथील अनाथ मुलांना अन्नधान्य, शालेय वस्तू व खाऊ वाटप केले. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, विंग गावचे उपसरपंच म्हणून जेव्हा त्यांनी कारभार स्वीकारला तेव्हापासून गावच्या प्रगतीमध्ये भर पडली आहे एक धडाडीचा , लहानपणीचा माझ्या मित्राची एवढी प्रगती बघून मनाला समाधान वाटते . या वेळी त्यांनी सचिन पाचपुते यांना शुभेच्छा दिल्या.

या नंतर सचिन दादा पाचुपते बोलताना म्हणाले की, जिजाऊ विस्तिगृहातील लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करून मनाला समाधान मिळाले. यापुढे कोणताही कार्यक्रम असेल तो या लहान मुलांमध्ये साजरा करण्यात मला आनंद मिळेल असे मनोगत सचिन पाचुपते यांनी व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे. बाबुराव खबाले ग्रामपंचायत सदस्य  विकास होगले, अक्षय पाटील, विजय पाचुपते, समीर नदाफ सलाम यांची उपस्थिती होती .